26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeहोमिओपॅथी औषधांनी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण

होमिओपॅथी औषधांनी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

भोपाळ : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने काही होमिओपॅथी औषधं घेण्याचा सल्ला दिला आहे आणि आता याच होमिओपॅथी औषधांनी कमाल करून दाखवली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होमिओपॅथी औषधांमुळे 3 कोरोना रुग्ण बरे झालेत. त्यामुळे आता आशा पल्लवित झाल्यात.

कोरोनाव्हायरसविरोधात सध्या कोणती लस नाही किंवा कोणतं प्रभावी औषध नाही. त्यामुळे इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे. त्यापैकी एक आहे ते म्हणजे हायड्रोक्लोरोक्वीन हे अँटिमलेरिया औषध. मात्र या औषधासह मध्य प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांना होमिओपॅथी औषधंही देण्यात आली आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. भोपाळच्या गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये 13 मे रोजी 3 कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणं होती. त्यांच्यावर होमिओपॅथी पद्धतीने उपचार सुरू होते.

Read More  सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर!

या रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या या रुग्णांना हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाशिवाय लक्षणांनुसार होमिओपॅथी औषधंही देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आलं. दहा दिवसांनंतर त्यांची तपासणी करण्यात आली आणि हे तिघंही स्वस्थ असल्याचं दिसून आलं. हॉस्पिटलच्या अधीक्षक डॉ. सुनीता तोमर यांनी सांगितलं, “सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना होमिओपॅथिक ट्रिटमेंट देण्यात आली. ज्यामुळे आता सर्व रुग्ण बरे झालेत. पूर्णपणे बरे होऊन हे रुग्ण घरी गेलेत”

औषधांच्या तुलनेत अधिक कुशलेतेने जखडून ठेवू शकतात
एएनआयच्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे (IHBT) डॉ. संजय कुमार यांनी कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, असं म्हटलं. डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं, “या चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोनाव्हायरसवर नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी असू शकतात. आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा वापर करून जैविक रूपानं सक्रिय 65 रसायन किंवा पॉलिफेनॉल्सचं परीक्षण केलं. जे विशिष्ट व्हायरल प्रोटिनला एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक कुशलेतेने जखडून ठेवू शकतात. मानवी पेशींत व्हायरसला प्रवेश करण्यात मदत करणाऱ्या व्हायरल प्रोटिनला हे रसायन निष्क्रिय करू शकतात”

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या