27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeगंगाखेड नगरपालिकेचे कोरोना पथक गायब

गंगाखेड नगरपालिकेचे कोरोना पथक गायब

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रसार शहरात होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांचा आदेशा अन्वये नगर परिषदेने शहरात पाहाणी व कार्यवाही करिता नेमण्यात आलेल्या करोना कोव्हिड पथक प्रमुख भगवान बोडखे,सहाय्यक सुरेश मणीयार गायबच आसल्याने शहरातील सोशल डिस्टन्शिंगचा फज्जा उडाला तर परवानगी नसलेले अस्थापने सुरू असणे असे प्रकार खुलेआम होताना दिसत आहे.

गायब आसणा-या या अधिका-यांवर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरीत आहे.कोरोना विषाणूचा प्रसार न होण्यासाठी जिल्हाधिकारी यानी नियोजनबध्द आरखडा नेमण्यात आला होता पण पोलिस प्रशासनाचा चेकपोष्ट वरील ढिसाळ नियोजना मुळे जिल्हासह तालुक्यात कोरोना बाधिताचा शिरकाव झाला यावरही नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील संपूर्णपणे जवाबदारी नगर परिषद प्रशासनाकडे देण्यात आल्याने मुख्यधिकारी नानासाहेब कामटे यांनी करोना कोव्हिड पथक शहरात गस्तीसाठी तैनात केले.

Read More  राजीव बजाज हे काही करोनाविषयक तज्ञ नव्हेत-भाजपने केला जोरदार पलटवार

ऊप मुख्य अधिकारी स्वाती वाकोडे,सौ.अंजना बिडगर यांचा दमदार कामगिरी नंतर या पथकात दि.२३ मे पासून बदल करून पथम प्रमुख भगवान बोडखे व सहाय्यक सुरेश मणीयार सह शिवाजी हजारे,भगवान जंगले,सुहास पाठक पोलिस कर्मचारी गोरे,चक्कर यांची नेमणूक केली असता पथक प्रमुख भगवान बोडखे व सहाय्यक सुरेश मणीयार हे गायबच झाल्याने बाजारपेठेत केवळ शिवाजी हजारे भगवान जंगले फोटो ग्राफर सुहास पाठक पोलिस कर्मचारी गस्तीवर फिरताना दिसत आहेत.

सकाळी सात ते दुपारी दोन दरम्यान गस्तीचा वेळेत भगवान बोडखे घरी तर सुरेश मणीयार स्वताचा कृषी केंद्रावर दिसत आहेत यामुळे बाजारपेठेत सोशल डिस्टन्शिंगचे तीन तेरा वाजले आहेत जिल्हाधिकारी यांचा आदेशा अन्वये सवलत दिलेल्या दुकाना शिवाय इतरही दुकाने सुरू झालेली आहेत शहरात विना मास्क फिरणा-याची संख्या वाढलेली आसल्याने कोरोना प्रसाराचे एक प्रकारे निमंत्रण मिळत आसताना स्पष्ट दिसत आहे.पथक प्रमुख सहाय्यकच गैरहजर आसल्याने दोनच कर्मचाºयांवर शहराची जवाबदारी दिसून येत आहे.कोरोना महामारीत कोरोना कोव्हिड पथक प्रमुख भगवान बोडखे सहाय्यक सुरेश मणीयार गैरहजर प्रकरणी मुख्यधिकारी कामटे यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांत होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या