24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Home‘कोरोना’मुळे ग्रा पं निवडणुकीची चर्चा थांबली

‘कोरोना’मुळे ग्रा पं निवडणुकीची चर्चा थांबली

जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर, अनेक गावांत निवडणुकांची चर्चा बंद

एकमत ऑनलाईन

जळकोट : ओमकार सोनटक्के
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे़ राजयतील आकडा २५ हजाराच्यावर पोहचला आहे़ तसेच जळकोट तालुका शेजारी असलेल्या उदगीर मध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे़ सध्या नागरिक कोरोनासंदर्भात काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे, या कोरोनामुळे अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे, सध्या मे महिन्यात जळकोट तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या, परंतु कोरोनामुळे आता या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आता सध्या गावात निवडणुकीची चर्चाच नाही, फक्त चर्चा आहे ती कोरोनाची.

जळकोट तालुक्यातील रावणकोळा, हळदवाढवणा, पाटोदा (खु) , तिरूका, घोणसी, डोंगरगाव, अतनूर, मरसांगवी, गव्हाण, धामणगाव, येलदरा, चिंचोली, सुल्लाळी, एकुर्का खु, बोरगाव, विराळ, कोळनूर, शेलदरा, वांजरवाडा, वडगाव, बेळसांगवी, सोनवळा, कोनाळी डोंगर, लाळी (बु), कुणक, मेवापूर, शिवाजीनगरतांडा, या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या, या गावच्या ग्रामपंचायतीची मुदम ही जूनमध्ये संपणार होती, त्यामुळे मे महिन्यात या निवडणुका होणे अपेक्षित होेते, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली होती, या ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती, त्यामुळे गावात निवडणुकांचे वारे वाहू लागले होते, गावातील पुढारी आपले गट तयार करण्यास सुरुवात करत असल्याचे दिसून येत होते.

परंतु ऐन निवडणुकीच्या हंगामात मार्च महिन्यात कोरोना आला, आणि सर्व कांही थंड झाले, निवडणुकांच्या चर्चा बंद झाल्या, गट तयार करणे थांबविण्यात आले, आरक्षणावरील जागेवर निवडणूक लढविण्यासाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र काढणे थांबले, यासोबत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबली आहे, त्यामुळे आता निवडणूक कधी होईल आता सांगता येणार नाही, या कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका या लांबणीवर पडल्या आहेत.

आरक्षण तेच राहणार की बदलणार
जळकोट तालुक्यात २७ ग्रामपंचायतीसाठी ८४ प्रभाग आहेत, यात २१७ ग्रामपंचायत सदस्यांची संख्या आहे, यातून एससीसाठी ५७ , एसटीसाठी ५, ओबीसीसाठी ५७ , ओपनसाठी ९८ जागा सोडण्यात आल्या आहेत, तर यात महिलांसाठी एससी ३४, एसटी ३, ओबीसी ३०, ओपन ५५ , अशा एकुण १२२ जागा महिलांसाठी आरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत. परंतु आता या आरक्षण सोडतीस तीन महिने संपले आहेत. त्यामुळे आता हे आरक्षण राहणार की बदलणार याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष लागले आहे.

कोरोना कमी झाल्यावरच निवडणुका घ्याव्यात
आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची मुदत संपली होती, यामुळे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो, सदस्यांचे आरक्षण सुटले होेते, त्यामुळे आमचे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते, परंतु कोरोना मार्च महिन्यात आल्यामुळे गावात निवडणुकीची चर्चा थांबली आहे, सध्या सर्वांचे कोरोनाकडे लक्ष आहे, कोरोना कमी झाल्यावरच निवडणुका घेणे गरजेचे आहे, निवडणुका लांबल्यामुळे कांही फरक पडणार आहे. अगोदर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणे गरजेचे आहे.
-मारोती पांडे
(माजी सरपंच तिरूका ता.जळकोट)

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या