21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयआंदोलनकर्त्या शेतक-यांची होणार कोरोना चाचणी

आंदोलनकर्त्या शेतक-यांची होणार कोरोना चाचणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. या आंदोलन करणा-या शेतक-यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सोनीपतचे जिल्हा दंडाधिकारी श्यामलाल पुनिया यांनी चाचणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. पुनिया यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांना आंदोलनात ठाण मांडून बसलेल्या शेतक-यांपैकी अंगात ताप असलेल्या शेतक-यांची एक यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

ताप असणा-या शेतक-यांची मोफत कोरोना चाचणी केली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्यास अशा शेतक-यांना मोफत सोयी-सुविधा आणि उपचार देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संकटात आंदोलनासाठी मोठ्या संख्येत शेतकरी एकत्र जमले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढली आहे. आंदोलक करणा-या शेतक-यांना कोरोना चाचणीसाठी तयार करणे हे देखील प्रशासनासमोर एक मोठे आव्हान आहे. शेतक-यांना नियमितपणे मास्क उपलब्ध करून देण्याचे आदेश देतानाच, मास्कचा वापर शेतक-यांनी करावा, असे आवाहन अधिका-यांनी केले आहे. तसेच आंदोलनस्थळी जमलेल्या महिलांनाही विशेष सुरक्षा तसेच सुविधा पुरवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक १५ मिनिटाला बलात्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या