मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. काल फडणवीस लातूरला होते. त्यांनी सोलापूर दौरा रद्द केला व ते मुंबईला परतले होते. फडणवीसांनी स्वत: ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.
शुक्रवारी फडणवीस लातूर दौ-यावर होते . त्या ठिकाणाहून ते सोलापूरला देखील जाणार होते. मात्र त्यांना ताप आल्यानंतर दौरा रद्द करून ते मुंबईकडे परतले होते. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
सध्या त्यांच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी दुस-या लाटेत देखील फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत.
बैठक रद्द
आज संध्याकाळी राज्यसभेसंदर्भातली बैठक देखील पार पडणार होती. मात्र, त्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार नाहीत.