लस विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करतेय : लस लागू झाल्यानंतर सुमारे 28 दिवसांनंतर त्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती सर्वाधिक
चीन : चीनमधून कोरोना विषाणूची लसी बनवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सुमारे 108 लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. चाचणी दरम्यान असे आढळले की ही लस विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करतेय. चिनी लसीच्या चाचणी संदर्भात वैद्यकीय जर्नल द लान्सेटमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संशोधकांनी अनेक लॅबमध्ये लसीचा अभ्यास केल्याचा दावा केला आहे.
Read More माळेगाव कारखान्यात वायूगळती; १३ कामगार अत्यवस्थ
ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस आणि अमेरिकन कंपनी मॉडर्ना या लसच्या आधी ही लस तयार झाल्याचेही समोर आले आहे. या वर्षाच्या सुरूवातीस चिनी लसीची मानवी चाचनी सुरू झाली होती. चीनी लसचे काही दुष्परिणाम देखील पाहिले गेले आहेत, तसेच या लसीमुळे कोणताही गंभीर धोका निर्माण झाला नाही.
अभ्यासानुसार ही लस लागू झाल्यानंतर सुमारे 28 दिवसांनंतर त्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती सर्वाधिक होती. सध्या जगातील विविध देशांमधील वैद्यकीय शास्त्रज्ञांची सुमारे 100 लोकांची टीम या लसीच्या शोधात गुंतली आहे. फायझर, बायोटेक आणि कॅनसिनो या कंपन्यांनी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू केली आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाने गुरुवारी सांगितले की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस तयार करण्यासाठी अॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीला 1.2 अब्ज डॉलर्स पर्यंत दिले जाईल.
Read More धक्कादायक : हिंगोली 6 नवे रुग्ण आढळले