27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeकरोना लशीच्या पुण्यात चाचण्या सुरू

करोना लशीच्या पुण्यात चाचण्या सुरू

एकमत ऑनलाईन

भारतातील सिरम ही लस बनविणारी अग्रगण्य संस्थाही कार्यरत
डॉ. नायडू रुग्णालयात क्‍लिनिकल ट्रायल सुरू – आयुक्‍त शेखर गायकवाड

पुणे – करोना अख्ख्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या साथीला आटोक्‍यात आणणाऱ्या लशीवर पुण्यात मानवावरील चाचण्या घेण्यात येत आहेत. या चाचण्यांचे निकाल यशस्वी ठरले तर नजीकच्या भविष्यात करोनावरील लस उपलब्ध होऊ शकेल.

जगभरात करोना लसीवरील संशोधन सुरू आहे. त्यातील महत्त्वाच्या संशोधन संस्थांशी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या संस्थेचा करार झाला आहे. त्यापैकी एका लशीची चाचणी पालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातही मागील 15 दिवसांपासून सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिली.

Read More  15000 फेशर्सना नोकरी देणार एचसीएल टॅक्नॉलॉजी

चाचण्यांचे स्वरूप आणि अधिक तपशील सांगण्यास गायकवाड यांनी असमर्थता व्यक्‍त केली. त्याबाबतची माहिती सिरम इन्स्टिट्यूट देऊ शकेल, असे ते म्हणाले. सिरम इन्स्टिट्यूटकडून याबाबत माहिती घेण्यसाठी प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

महापालिकेच्या नायडू रुग्णालयात सध्या सुमारे 300 रुग्ण उपचार सुरू आहेत. केंद्रच्या सूचनेनुसार या चाचण्या सुरू आहेत. वेगवेगळ्या संस्था करोना लस विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्यात, भारतातील सिरम ही लस बनविणारी अग्रगण्य संस्थाही कार्यरत आहेत. सिरमकडून विकसित करण्यात येणाऱ्या लसीच्या चाचण्यांसाठी केंद्र शासनाने सिरमला परवानगी दिली आहे. तसेच त्याचे परिणाम तसेच इतर बाबी या संबधित संस्थेशी संबधित आहेत, असे आयुक्‍तांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या