31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनामुक्तांची श्रवणशक्ती कमी होतेय

कोरोनामुक्तांची श्रवणशक्ती कमी होतेय

एकमत ऑनलाईन

लंडन : कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त झाले आहेत़ मात्र, कोरोनामुक्त होणा-यांची संख्या अधिक आहे़ असे असले तरी कोरोनातून रुग्ण बरे होतात पण कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम समोर येत आहेत़ कोरोनामुळे लोकांची ऐकण्याची क्षमता जाऊ शकते, ते बहिरे होऊ शकतात, असा धक्कादायक अहवाल ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांनी दिला आहे.

ब्रिटनमध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला असून, यातून अनेक कोरोना रुग्णांना बहिरेपणा आला आहे. असे असले तरीही अशा रुग्णांची संख्या तुलनेत कमी असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांच्या म्हणण्यानुसार रुगणांमध्ये याबाबतीत जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी फ्ल्यूने सुद्धा ही समस्या उद्भवू शकते, असे मतही त्यांनी नोंदवले आहे.

एरवी सर्दी पडसे झाले की आपल्या कानांनाही दडे बसतात. ऐकू येत नाही. पण पूर्ण बहिरेपणा आल्याच्या खूप कमी केसेस आहेत. बीएम जे केस रिपोर्टमध्ये प्रकाशित अहवालानुसार एका दम्याच्या ४५ वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली. यामुळे त्याची ऐकण्याची क्षमता अचानक नाहीशी झाली, त्याला ऐकायला येत नव्हते. कोरोना होण्यापूर्वी त्याला ऐकण्याबद्दल कोणतीच अडचण नव्हती. त्याला अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित ऐकू येत होते. यानंतर त्याला स्टेरॉईडच्या गोळ्या आणि काही लसी दिल्या गेल्या. या उपचारांमुळे त्याला काही प्रमाणात पुन्हा ऐकायला येऊ लागले.

स्टेरॉईडच्या माध्यमातून होतायेत समस्या दूर
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांच्या म्हणण्यानुसार रुगणांमध्ये याबाबतीत जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. याचे निदान झाल्यानंतर स्टेरॉईडच्या माध्यमातूनही समस्या दूर केली जाऊ शकते, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

कोरोनामुक्तांना विविध समस्या
कोरोनानंतर अनेक रुग्ण विविध समस्यांशी झगडत असल्याचे समोर आले आहे. अनेकांना महिनोंमहिने श्वास घेण्यास त्रास होतो. काही जणांना धाप लागणे, अशक्तपणा अशा समस्या समोर आल्या.

अधिक संशोधनाची गरज
आधीच जग कोरोनानी इतके भयभीत झाले आहे की, लोकांना कोरोनाची लागण झाली की आपण मरणार असे वाटू लागले. त्यात अशा माहितीमुळे कोरोनाची भीती अधिकच वाढली आहे. यावरही अधिक संशोधनाची गरज असल्याचे समोर आले आहे.

चिनी सैनिकाचा थंडीने मृत्यू; भारतीय सैनिक ठणठणीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या