Tuesday, September 26, 2023

कोरोनारुग्णांनी ओलांडला १ लाखाचा टप्पा

​मुंबई  : देशभरात कोरोना पाॅझिटीव रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून काल देशभरात कोरोना रुग्णांनी एक लाखाचा टप्पा पार केला आहे. एक लाख रुग्णांपैकी फक्त ३५ हजार रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत हे महत्वाचे.

देशात सध्या  १ लाख ३२८ तर महाराष्ट्रात ३५ हजार ५८ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची संख्या आता झाली आहे. मागील तीन दिवसात तब्बल १४ हजार ४७२ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढ झाली आहेत व त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात ५ हजार ९५८ रुग्णांची वाढ झाली आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया व ब्राझील मध्ये कोरोनाचा कहर वेगाने वाढु लागला आहे.

Read More  अमेरिकेच्या ‘बायो लॅब’मध्ये तयार झाला कोरोना व्हायरस

मे महिन्यात देशात मुख्यतः महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. १ मे पासून देशातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६५ हजार ४६१ ने वाढली आहे व एकट्या महाराष्ट्रात २४ हजार ५६० रुग्ण वाढले आहेत. ६ % प्रतिदिन गतीने महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. शासनाच्या नवीन डिस्चार्ज पाॅलिसीमुळे महाराष्ट्रात एकुण २४ .०७ % रुग्ण बरे झाले आहेत. तसेच राज्यात आत्तापर्यंत १ हजार २४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे व मृत्यूचा दर ३.५६ % इतका आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या