22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनाचा भारतावर दूरगामी परिणाम

कोरोनाचा भारतावर दूरगामी परिणाम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ भारतात कोरोना ठाण मांडून बसला आहे. या काळामध्ये लाखो भारतीयांना करोनाची लागण झाली असून त्यात मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे देशात १०० कोटी लसीकरणाचा उत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे करोनामुळे भारतावर झालेल्या गंभीर परिणामाचा दाखला एका अभ्यासातून समोर आला आहे.

कोरोना काळात अर्थात गेल्या साधारणपणे दोन वर्षांमध्ये देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी घटले आहे. मुंबईतल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीजने अर्थात आयआयपीएसने हा अभ्यास केला असून, त्यांनी नुकताच आपला अहवाल जाहीर केला आहे. कोरोनाच्या साथीचे देशभरातील मृत्यूदरावर कशा प्रकारे परिणाम झाले, याचा अंदाज घेण्यासाठी आयआयपीएसकडून हा अभ्यास करण्यात आला होता.

या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे त्याचा देशाच्या सरासरी आयुर्मानावर काय परिणाम झाला, याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला. यासाठी ग्लोबल बर्डन डिसीज स्टडी आणि कोविड इंडिया अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामच्या पोर्टलवरून माहितीचा वापर करण्यात आल्याचे आयआयपीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, या अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या पुरुषांमध्ये प्रामुख्याने ३५ ते ६९ वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. सरासरी आयुर्मान घटण्यामध्ये या वयोगटात झालेले मृत्यू प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचेदेखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दोन वर्षांनी आयुर्मान घटले
या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, कोरोना काळात देशातील सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता भारतातील सरासरी आयुर्मान हे २०१० मध्ये होते, तितके झाल्याचा दावा देखील संस्थेकडून करण्यात आला आहे. करोनाच्या आधी भारतातील सरासरी आयुर्मान पुरुषांसाठी ६९.५ वर्ष इतके होते. तेच आता ६७.५ वर्ष अर्थात दोन वर्षांनी घटल्याचे या अभ्यासातून समोर आलं आहे. त्यासोबरतच, महिलांसाठी जे आयुर्मान ७२ वर्ष होते, ते आता ६९.८ वर्ष अर्थात २ वर्ष चार महिन्यांनी घटले आहे.

गेल्या १० वर्षांची मेहनत व्यर्थ
यासंदर्भात बोलताना आयआयपीएसचे सहाय्यक प्राध्यापक सुर्यकांत यादव म्हणतात, गेल्या १० वर्षांत आपण देशवासीयांचे सरासरी आयुर्मान वाढवण्यासाठी जी काही प्रगती केली होती, ती सगळी कोरोना काळात धुवून निघाली आहे. आता २०१० मधल्या आयुर्मान पातळीवर आपण जाऊन पोहोचलो आहोत. आता पुन्हा आयुर्मान पूर्ववत करण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष लागू शकतात.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या