Thursday, September 28, 2023

कोरोनाचा कहर वाढला : जालन्यात आणखी दहा रुग्ण

 जिल्ह्याची संख्या आता 71 वर पोहचली

जालना  :  जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज आणखी नवीन दहा रूग्णांची भर पडली असून जिल्ह्याची संख्या आता 71 वर पोहचली आहे. जालना जिल्हा रुग्णालयातर्फे शनिवारी एकूण 106 संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन ते रविवारी सकाळी प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 105 अहवाल प्राप्त झालेत.

Read More  केसर जवळगा येथे आढळला कोरोना रुग्ण

त्यात जालना शहरातील जुना जालना भागातील नामांकित असलेल्या एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. तर जालना तालुक्यातील नूतनवाडी येथील 2,अंबड तालुक्यातील पिरनेर येथील 1,मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा आणि कानडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा रुग्णांचा समावेश आहे. त्यात सहा महिला व चार पुरुष असल्याची माहिती आहे. त्यामुळं जालना आता शंभरीकडे वाटचाल करत असल्यानं जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या