24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा संसर्गाचा धोका!

कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा संसर्गाचा धोका!

एकमत ऑनलाईन

जगावर चिंतेचे ढग, हॉंगकॉंगमध्ये दुस-यांदा कोरोना झालेला आढळला पहिला रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या थैमानापुढे जगभरातील अनेक देश जेरीस आले असून, रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्णसंख्या, मृत्यूच्या आकड्यात होत असलेली वाढ यामुळे काहीसे चिंतेचे ढग असतानाच आणखी एक काळजी वाढविणारी माहिती समोर आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असून, हॉंगकाँगमध्ये दुस-यांदा कोरोना झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे.हॉंगकाँग विद्यापीठाने हा दावा केला आहे.

हॉंगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, हॉंगकाँगमधील एका व्यक्तीला दुस-यांदा कोरोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. ही नोंदणीकृत पहिलीच घटना आहे. ३३ वर्षीय आयटी कर्मचा-याला एप्रिलमध्ये कोरोना झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्या कर्मचा-याला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमधून परतल्यानंतर पुन्हा कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर हे समोर आले. कोरोनातून ब-या झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होत नसल्याचा दावा वारंवार केला जात असतानाच ही घटना समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. एवढेच काय, तर जगभरही अजून कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र नाही. त्यामुळे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, आतापर्यंत एकदा कोरोनाचा संसर्ग झाला की, पुन्हा त्याचा संसर्ग होत नाही, असा तज्ज्ञांनी दावा केला होता. कारण शरीरात अ‍ँटिबॉडीज तयार झाल्याने पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकत नाही. कारण या अ‍ँटिबॉडीज कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले होते. मात्र, आता हॉंगकॉंगमध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णाला चार महिन्यांनंतर पुन्हा संसर्ग झाला. हे जगातील पहिलेच उदाहरण आहे. चार महिन्यांनी पुन्हा त्याला कोरोना झाल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच देशांना आणि राज्यांना अ‍ॅलर्ट राहावे लागणार आहे. एवढेच नव्हे, तर यापुढेदेखील सावध पावले टाकावी लागणार आहेत.

तयार होणा-या अ‍ँटीबॉडीजचे काय?
कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. वॉशिंग्टन विद्यापीठातील व्हायरोलॉजी लॅबमधील सहाय्यक संचालक अलेक्झांडर ग्रेनिंजर आणि फ्रेड हच कॅन्सर संशोधन केंद्राच्या संशोधकांनी ही माहिती दिली होती. मात्र, हॉंगकॉंगमधील उदाहरण लक्षात घेता हा दावा फोल ठरतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे, तर शरीरात निर्माण होणा-या अ‍ँटीबॉडीजचे काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.

पुन्हा कोरोना होणार नसल्याचा आयसीएमआरनेही केला होता दावा
आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या निरीक्षण गटातील सदस्यांनी अशाच प्रकारचा दावा केलेला आहे. कोरोनातून ब-या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोना होण्याचा धोका नाही, असे निरीक्षण या सदस्यांनी नोंदवले होते. मात्र, हॉंगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी पुन्हा कोरोना होण्याचा धोका असल्याचा दावा केला आहे.

लॉकडाऊन उघडण्याची घाई नाही : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या