बीजिंग, 07 जून : मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आधीपासून इतर आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं आहे की, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी जर त्यांची बीपीवरील औषधं घेणं थांबवलं तर त्यामुळे त्यांना मृत्यूचा धोकाही जास्त आहे. चीनच्या झिजिंग हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांनी हुओ शेन शॅन हॉस्पिटलमधील रुग्णांचा अभ्यास केला. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 5 फेब्रुवारी ते 15 मार्चदरम्यान 2,866 रुग्णांच्या केलेल्या या अभ्यासात संशोधकांना दिसून आलं.
उच्च रक्तदाब नसलेल्या 2027 पैकी 22 म्हणजे 1.1 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर उच्च रक्तदाब असलेल्या 850 पैकी 34 म्हणजे 4% कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. फक्त उच्च रक्तदाब असलेल्या कोरोना रुग्णांची तुलना करता, बीपीची औषधं घेणाऱ्या 710 पैकी 23 म्हणजे 3.2% कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर बीपीची औषधं न घेणाऱ्या 140 पैकी 11 म्हणजे जवळपास 8% रुग्णांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला. याचा इतर कोरोना रुग्णांच्या तुलनेत हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका दुपटीपेक्षा अधिक आहे. मात्र त्यातही हायपरटेन्श असलेले जे कोरोना रुग्ण बीपीची औषध घेत नाहीत त्यांना इतर हायपरटेन्श असलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचा धोका दुपटीपेक्षा अधिक आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची औषधच कोरोना रुग्णांना संरक्षण देत असल्याचं संशोधकांना दिसून आलं.
Read More हज यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन
संशोधनाचे अभ्यास फि ली म्हणाले, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थिती विशेषत: त्यांना कोरोनाची लागण झालेली असेल तर स्वत:ची जास्त काळजी घ्यायला हवी. ज्या रुग्णांनी काही कारणांमुळे बीपीची औषधं घेणं थांबवलं त्यांचा मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे, हे आम्हाला दिसून आलं. त्यामुळे डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत रुग्णांनी त्यांच्या उच्च रक्तदाबाच्या उपचारात बदल करू नयेत.