22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रनारायण राणेंना कोर्टाचा दणका; मुंबई पालिकेचा बंगल्यावर हातोडा पडणारच!

नारायण राणेंना कोर्टाचा दणका; मुंबई पालिकेचा बंगल्यावर हातोडा पडणारच!

एकमत ऑनलाईन

मुंबई : अधिश बंगला बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत १० लाखांचा दंड ठोठावला असून मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास परवानगीही दिली आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथे अधिश
नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेने दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती. नारायण राणेंनी या नोटीशीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने राणेंची याचिका निकाली काढली आहे. यावेळी कोर्टाने अंतिम निर्णय देत राणेंना झटका दिला आहे.

आज कोर्टाने अंतिम निर्णय दिला आहे. बांधकाम नियमीत करण्याची त्यांची याचिका नाकारली आहे. कोर्टाने सांगितले की नारायण राणे यांनी समुद्रकिनारी तिप्पट बांधकाम केले आहे. त्यांच्या वकिलांनी कारवाई करण्यास स्टे मागितला तर तो ही नाकारली आहे. त्यांच्यावर १० लाखाचा दंड ही ठोठावला आहे, त्यामुळे महापालिकेला अवैध बांधकाम तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती वकील आदित्य प्रताप यांनी दिली.

दरम्यान, तक्रारकर्ते संतोष दौंडकर यांनी कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. ‘आज सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे. नारायण राणे यांनी केलेले अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश न्यायालयाने बीएमसीला दिले आहे. मी २०१६ पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. एक चांगला आदर्श आजच्या निकालाने मिळाला आहे. त्यामुळे बीएमसीने आता कारवाई कराव’ असं दौंडकर म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या