27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रराणा दाम्पत्याला कोर्टाची नोटीस

राणा दाम्पत्याला कोर्टाची नोटीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामिनाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुमचा जामीन का रद्द करू नये, अशी विचारणा करीत नोटीस बजावली आहे. दरम्यान, १८ मेपर्यंत आपली मांडावी, असे राणा दाम्पत्याला सांगितले. त्यामुळे १८ पर्यंत तरी त्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. त्यावेळी कोर्टाने काही अटीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या अटीचे उल्लंघन झाल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. त्यावरून राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे.

राणा दाम्पत्यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नवनीत कौर राणा यांना मानदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी ११ वाजेदरम्यान नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राणांनी यादरम्यान काही वक्तव्ये केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलू नका, अशी अट जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर होताना घातली होती. मात्र, काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

राणा दाम्पत्याचे जामीन रद्द करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश न्यायालयाने दिलेले नाहीत. त्यामुळे राणा दाम्पत्याला तूर्त दिलासा मिळाला. पंरतु राज्य सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नवनीत राणांनी रुग्णालयातून बाहेर येताच राज्य सरकार आणि हनुमान चालिसावर वक्तव्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनादेखील राणांनी निवडणूक लढण्याचे आव्हान दिले. त्यामुळे राणा यांनी कायदा मोडल्याची याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली आहे.

आता फक्त भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस
कोर्टाने जामीन मंजूर करताना म्हटले होते की, जर एकाही अटीचे उल्लंघन झाले तर जामीन रद्द केला जाऊ शकतो. मात्र, सध्या कोर्टाने केवळ राणा दाम्पत्याला आपली भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस पाठवली आहे. त्यावर सुनावणी नेमकी कधी होईल, याची माहिती कोर्टाने दिलेली नाही.

न्यायालय आम्हाला न्याय देईल : खा. राणा
न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर राणा दाम्पत्याने आम्ही कोणत्याही प्रकारच्या अटींचे उल्लंघन केलेले नाही, टीकेला उत्तर देणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. आम्ही वकिलांशी चर्चा केली. आम्ही आमचा जबाब न्यायालयात दाखल करू, त्यानंतर आम्हाला न्यायालय न्याय देईल, अशी प्रतिक्रिया दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या