नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : कोट्यवधींचं कर्ज बुडवून भारतातून पळालेल्या विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. विजय मल्ल्याची पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. आपल्या जुन्या निकालावर न्यायालय ठाम असून पुनर्विचार करण्यास नकार दिल्यानं मल्ल्याला मोठा दणका बसला आहे.
न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आपल्या मुलांच्या नावावर 4 कोटी अमेरिकन डॉलर्स ट्रान्सफर केले होते. या प्रकरणी 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयानं आदेशाचं उल्लंघन केल्यानं मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होतं. यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. न्यायालय आपल्या जुन्या निर्णयावर ठाम असून पुनर्विचार करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
Supreme Court dismisses a plea filed by fugitive businessman Vijay Mallya, seeking a review of its May 2017 order holding him guilty of contempt for transferring USD 40 million to his children, in violation of the court's order pic.twitter.com/JxmEhu1CCq
— ANI (@ANI) August 31, 2020
अमित देशमुख भविष्यात मुख्यमंत्री होतील