38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeकंटेनमेंट झोनमध्ये गस्तीसाठी कोव्हिड बाईक

कंटेनमेंट झोनमध्ये गस्तीसाठी कोव्हिड बाईक

एकमत ऑनलाईन

नांदेड : विशेष प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात गस्त घालण्यासाठी पोलीस दलाला विशेष कोविड बाईक तयार करण्यात आल्या असून अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या या बाईक गस्त घालण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थित या बाईकचे लोकार्पन करण्यात आले़ पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतील नांदेडचा हा पॅटर्न आता सर्व राज्यभर लागू होण्याची शक्यता आहे.

नांदेड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून आतापयृंत सहा परिसर कंटनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. अशा एकूण ३२ गाड्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या गाड्या जुन्या असून त्याला केवळ नवीन रुप देण्यात आले आहे. टाकाऊ मधून टिकाऊ करण्याची कल्पनेला दाद द्यावी लागेल.

Read More  उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

या भागात गस्त घालण्यासाठी पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ११ मोटारसायकल तयार केल्या आहेत. या मोटारसायकलला सायरन वॉकी टॉकी आदी सुविधा आहेत. या मोटारसायकला कोविड-१९ असे नाव देण्यात आले असून आजपासून या कोविड बाईक सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. शहरातील देगलूर नाका येथे या बाईकचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारका दास चिखलीकर, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे आदी उपस्थिती होते. लॉकडाउनच्या काळात नांदेड ने सर्वात प्रथम राबवलेले बॅरिकेटिंग, नाकाबंदी, वाहनवरील कारवाई, सॅनिटायझर मशीन, बाहेरून येणा-या प्रवाशांची तापमान तपासणी मशीन, राज्य सीमा बंदी हे सर्व उपक्रम नांदेड नंतर राज्याने राबवले आहेत.

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी अनेक उपक्रम नव्याने राबवत असतांना आपल्या पोलिस कर्मचाºयांचा सातत्याने विचार केला आहे. रात्रीच्या गस्तीच्यावेळी कंटेन्मेट झोनमध्ये चारचाकी घेवून जाणे शक्य नसते. अनेक छोट्या गल्ल्या असल्यामुळे त्या ठिकाणाहून चारचाकी जात नाही. त्या ठिकाणी पोलिस कर्मचाºयांना पायी जावे लागत होते. हे लक्षात घेवून पोलिस अधीक्षक मगर यांनी जुन्या गाड्यांना नवे रुप देण्याचा निर्णय घेतला आणि तात्काळ अंमलात आणल्यामुळे गस्तीतील कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या