28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeराष्ट्रीयकोविड - 19 : फ्लू किंवा इन्फ्लूएन्झामुळे वास किंवा चव घेण्याची क्षमताही...

कोविड – 19 : फ्लू किंवा इन्फ्लूएन्झामुळे वास किंवा चव घेण्याची क्षमताही बिघडते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वास किंवा चव घेण्याची क्षमता अचानक गमावणे हे कोविड – 19 च्या अन्वेषणात निकष म्हणून सहभागी करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. शुक्रवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची प्रकरणे भारतात सातत्याने वाढत आहे. रविवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती, परंतु त्यावर एकमत झाले नाही.

आरोग्य मंत्रालयाच्या एका सूत्राने सांगितले की, बैठकीत काही सदस्यांनी कोविड – 19 च्या चौकशीत अनेक रूग्णांमध्ये वास वा चव येण्याच्या शक्ती नष्ट होण्याच्या निकष म्हणून सुचवले. काही तज्ज्ञांच्या मते, जरी ही लक्षणे कोविड – 19 दिसत असली तरी त्याचा थेट संबंध नाही. कारण फ्लू किंवा इन्फ्लूएन्झामुळे त्या व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमताही बिघडते, हे या आजाराचे प्राथमिक लक्षण असू शकते. आणि लवकरच यावर उपचार करता येऊ शकते.

यूएस नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) यांनी मेच्या सुरुवातीला कोविड – 19 ची नवीन लक्षणे समाविष्ट केली होती. ज्यात वास कमी होणे किंवा चव गमावणे यांचा समावेश आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) 18 मे रोजी कोविड – 19 साठी जाहीर केलेल्या सुधारित तपासणी रणनीतीनुसार हाय रिस्कमधील लोकांच्या संपर्कात आल्यानंतर पुढील 5 ते 10 दिवसांत एकदा तरी तपासणी करणे आवश्यक आहे.

Read More  भारत आणि अमेरिकेत असहिष्णुतेचे वातावरण

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या