24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनावर भारताची पहिली लस 'कोविशिल्ड' 73 दिवसांत मिळणार

कोरोनावर भारताची पहिली लस ‘कोविशिल्ड’ 73 दिवसांत मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ 73 दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना हा दावा केला आहे.

ते म्हणाले, भारत सरकारने आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना दिला आहे. या अंतर्गत, आम्ही चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगवान केली आहे जेणेकरुन चाचणी 58 दिवसात पूर्ण होईल. अशा प्रकारे, तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस 29 दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर 15 दिवसांनंतर येईल. यानंतर आम्ही कोविशिल्डला व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणण्याचे विचार करत आहोत असे ते म्हणाले. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील असं सांगितले जात होते.

भारत आणि जगातील इतर 92 देशांमध्ये विकेल

या लसीची चाचणी होण्यासाठी 7-8 महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगितले जात होते. परंतु सध्या 17 सेंटरवरील 1600 लोकांवर 22 ऑगस्टपासून चाचणी करण्यात येत आहे. प्रत्येक सेंटरवर 100 स्वयंसेवक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस सीरम इंस्टिट्यूटची असणार आहे. कंपनीने अ‍ॅस्ट्रा झेनेका नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. जेणेकरून सीरम इंस्टीट्यूट ही लस भारत आणि जगातील इतर 92 देशांमध्ये विकेल. त्या बदल्यात सीरम इन्स्टिट्यूट अ‍ॅस्ट्रा झेनेकाला रॉयल्टी फी देणार आहे.

भारताची लोकसंख्या सध्या सुमारे 130 कोटी

केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटकडून 68 कोटी लस खरेदी करणार आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत भारतीयांना मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. भारताची लोकसंख्या सध्या सुमारे 130 कोटी आहे. सीरमकडून 68 कोटी डोसची खरेदी केल्यानंतर उर्वरित लशीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या कोवाक्सिन तसेच खासगी फार्मा कंपनी Zydus Cadila द्वारे विकसित होत असलेल्या ZyCoV-D ऑर्डर देऊ शकतात. मात्र या कंपन्यांच्या कोरोना लस चाचण्या यशस्वी झाल्या पाहिजेत. ‘बिझनेस टुडे’ यांनी ही माहिती दिली आहे.

वैतागून पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या