27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रविजेच्या झटक्याने गायींचा मृत्यू ;औक्षण करून दिला अखेरचा निरोप

विजेच्या झटक्याने गायींचा मृत्यू ;औक्षण करून दिला अखेरचा निरोप

एकमत ऑनलाईन

जालना : विजेच्या स्पर्शाने पोळ्याच्या दिवशी मृत झालेल्या गायींचे गावातील महिलांनी औक्षण करून त्यांना ७०० ते ८०० साड्या नेसवून भावपूर्ण निरोप दिला. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या आंबा गावातील ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी त्या मृत गायींना निरोप दिला. पोलिस अधिका-याच्या उपस्थितीत अन्त्यसंस्कार करण्यात आले.

शेतात विजेचा धक्का लागून २६ ऑगस्टला ६ गायी आणि ४ वासरांचा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आंबा येथे मृत्यू झाला होता. भर पोळ्याच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे पोळा सण साजरा न करता गावक-यांनी दुखवटा पाळला होता. त्या मृत गायींवर काल २७ ऑगस्ट रोजी साश्रूनयनांनी पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठले यांच्या उपस्थितीत अन्त्यसंस्कार करण्यात आले.

या अन्त्यविधीला आंबा गावातील ग्रामस्थ आणि महिलांची उपस्थिती होती. पोळ्याच्या दिवशी आंबा गावावर दु:खाचे सावट पसरले होते. या मृत गायींवर अन्त्यसंस्कार करताना आंबा गावाच्या महिला भगिनींनी अक्षरश: हंबरडा फोडला. विशेष म्हणजे गावातील सर्व महिलांनी या मृत गायींचे औक्षण करून त्यांना ७०० ते ८०० साड्या नेसवून निरोप दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या