अहमदबाद : शहरात उष्णतेबरोबरच आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अहमदबाद येथे दोन ते तीन दिवसांत आगीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. बुधवारी अहमदाबादच्या बापू नगर भागात फटाक्यांच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. फटाका कारखान्याला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.