24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयभावना समजणा-या अनोख्या रोबोची निर्मिती

भावना समजणा-या अनोख्या रोबोची निर्मिती

एकमत ऑनलाईन

चेन्नईतील १३ वर्षीच्या मुलाचा भन्नाट शोध

चेन्नई : रोबोट ही मानवाची संकल्पना आहे. आता मानवाने विविध प्रकारचे रोबोट तयार केले. जे वेगवेगळ्या कामांमध्ये मदत करतात. याशिवाय हुबेहुब माणसाप्रमाणे दिसणारे रोबोट तयार करण्यात आले आहेत. हे रोबोट माणूस सांगतो ते प्रत्येक काम करतात. मात्र त्यांना माणसाप्रमाणे भावना समजत नाहीत. त्यामुळे माणसाप्रमाणे रोबोट कितीही चोख काम करु लागला तरी, भावनांची पोकळी कायम आहे. पण चेन्नईमधील एका मुलाने भावना समजणारा रोबोट बनवण्याचा दावा केला आहे.
तामिळनाडूमध्ये राहणारा १३ वर्षीय प्रतिक याने तुमचे सुख आणि दु:ख समजणारा रोबोट तयार केल्याची सध्या चर्चा आहे.

माणूस आणि रोबोटमध्ये बरंच साम्य आहे. दोघांना दोन हात आणि पाय आहेत. दोघेही बुद्धीची कामे करु शकतात, वजन उचलू शकतात. पण या दोघांमध्ये भावनेची पोकळी कायम होती, मात्र ही पोकळीही आता मिटल्याचे दिसत आहे. तामिळनाडूतील १३ वर्षीय मुलाने भावना जाणणारा रोबोट डिझाइन केल्याचा दावा केला आहे. प्रतीक नावाच्या या मुलाने भावना समजणारा रोबो तयार केला असून आपल्या रोबोचें नाव ‘रफी’ (फाां्र) ठेवले आहे.

प्रतीकने सांगितले की, त्याचा ‘रफी’ रोबोट त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो, परंतु तुम्ही त्याला ओरडल्यावर जोपर्यंत तुम्ही त्याची माफी मागत नाही तोपर्यंत तो प्रतिसाद देणार नाही. प्रतिकने असा दावा केला की, ‘रफी’ तुमच्या भावना समजू शकतो. तुम्ही दु:खी असाल तर तो तुमचा चेहरा आणि मन ओळखू शकतो.

भारत तंत्रज्ञानामुळे नवी उंची गाठेल
तंत्रज्ञानाला वेगळ्या उंचीवर नेणा-या तामिळनाडूच्या या मुलावर नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला. काहींनी असेही सुचवले की रोबोटमध्ये चेहरे आणि आवाजांचा डेटा असणे आवश्यक आहे. एका युजरने म्हटले आहे की, भारतात खूप प्रतिभा आहे. पुढील १० वर्षांमध्ये भारत तंत्रज्ञानामुळे नवी उंची गाठेल. तंत्रज्ञान मुलांना शिकण्याची आणि विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या