23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeप्रेक्षकांविना क्रिकेट म्हणजे नवरीशिवाय लग्न!

प्रेक्षकांविना क्रिकेट म्हणजे नवरीशिवाय लग्न!

एकमत ऑनलाईन

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरचे मत

कराची : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला होता. मात्र क्रीडा सामन्यांवर अवलंबून असणाºया लोकांचा रोजगार व होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता हळूहळू महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येतो आहे. जर्मन सरकारने मानाच्या इ४ल्लीि२’्रँ स्पर्धेला मान्यता दिली असून १६ मे पासून या स्पर्धेला सुरुवातही झाली. फुटबॉल स्पर्धेला झालेली सुरुवात पाहून क्रिकेटचे सामनेही प्रेक्षकांविना खेळवण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Read More  क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात ?

मार्च महिन्यापासून बंद असलेले क्रिकेटचे सामने सुरू करण्याचा विचार आयसीसीने अद्याप घेतलेला नाही. क्रिकेट बोर्डांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसी आगामी काळात प्रेक्षकांविना सामने खेळवण्यास परवानगी देऊ शकते. मात्र पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या मते प्रेक्षकांविना सामना खेळण्यास काही अर्थ राहणार नाही. ‘‘प्रेक्षकांविना सामना खेळण्याचा निर्णय कदाचित योग्य ठरू शकेल. पण यामधून आपण फार काही साध्य करू असे मला वाटत नाही. रिकाम्या मैदानात सामने खेळणे म्हणजे बायकोशिवाय लग्न करण्यासारखे आहे.

Read More  राज्यात आता केवळ २ झोन!

खेळाडूंना प्रेक्षकांची गरज असते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती येत्या वर्षभरात सुधारेल अशी मला आशा आहे.’’ हॅलो अ‍ॅपशी बोलताना अख्तरने आपले मत मांडले. आतापर्यंत अनेक माजी खेळाडूंनी आयपीएलसारखी महत्त्वाची स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवा असा पर्याय समोर ठेवला आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभा करण्यासाठी शोएब अख्तरने काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भारतीय खेळाडूंनी याला विरोध दर्शवला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या