कोलंबो : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शेहान मदुशनकाला श्रीलंकेच्या पोलिसांनी अमली पदार्थ (हेरॉईन) ठेवण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाºयांनी सोमवारी ही माहिती दिली. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाºया लंकेच्या मदुशनकाने बांगलादेशविरुध्द एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. दंडाधिकाºयांनी २५ वर्षीय मदुशनकाला दोन आठवड्यांसाठी कोठडी सुनावली आहे. रविवारी त्याला पनाला शहरात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉईन होते, असे पोलिसांना सांगितले आहे.
कोरोनामुळे सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये मदुशनका गाडी चालवत होता. त्यावेळी त्याला थांबवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यासमवेत गाडीत आणखी एक व्यक्ती होती. जानेवारी २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करताना मदुशनकाने हॅट्ट्रिक घेतली. यावर्षी याच संघाविरुद्ध त्याने दोन टी-२० सामने खेळले. पण दुखापतीमुळे मदुशनकाला कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही.
ड्रग्जसोबत आढळला क्रिकेटपटू !
एकमत ऑनलाईन