23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रिकेटपटू तजिंदर सिंग बनला देवदूत

क्रिकेटपटू तजिंदर सिंग बनला देवदूत

एकमत ऑनलाईन

लॉकडाऊनच्या काळात १० हजार मजुरांना केली मदत

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला स्थलांतरित मजूर आपल्या घरी परतत आहेत. पण घरी परतत असताना त्यांना बºयाच गोष्टींचा सामना करावा लागत आहे. काही मजूर तर रस्त्याने चालत आपल्या गावी निघाले आहेत. पण या प्रवासामध्ये त्यांना जीवनावश्यक गोष्टीही मिळताना दिसत नाहीत. अशा मजुरांसाठी एक क्रिकेटपटू देवदूत म्हणून पुढे आला आहे. आतापर्यंत जवळपास दहा हजार मजुरांना त्याने मदत केल्याचे पुढे आले आहे.

Read More  १० टक्के पीएफ योगदान सुविधा लागू

हे मजूर आपल्या गावी चालत जात असताना त्यांच्या जेवणाचे हाल होतात. त्याचबरोबर उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही होत नाही. त्याचबरोबर काही मजूर तर अनवाणी पायाने चालत जात आहेत. या सर्वांना या क्रिकेटपटूने मदत केल्याचे पाहायला मिळाले आहे. मजुरांची भूक शमवण्यासाठी त्याने ५० किलो गव्हाचे पीठ घेतले आणि त्याच्या पुºया घरच्यांसहित शेजाºयांना बनवायला सांगितल्या. त्याचबरोबर भाजीही तयार केली आणि त्याचे एक पॅकेट बनवून या मजुरांना दिली. त्याचबरोबर या मजुरांच्या मुलांसाठी दुधाची व्यवस्थाही या क्रिकेटपटूने केली आहे. या मजुरांना तहान लागत असल्यामुळे त्यांना सरबतही तो देत असल्याचे पुढे आले आहे. त्याचबरोबर अन्य बरीच मदत तो मजुरांना करत असल्याचे समोर आले आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू
तब्बल दहा हजार मजुरांना मदत करणारा हा क्रिकेटपटू आहे तरी कोण, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. हा क्रिकेटपटू आहे आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू तजिंदर सिंग ढिल्लोन. आतापर्यंत त्याने स्थलांतरित मजुरांना भरपूर मदत केली आहे. याबाबत तजिंदर म्हणाला की, माझे घर हायवेपासून जवळ आहे. या रस्त्यावरून काही स्थलांतरित मजूर जाणार असल्याचे वृत्त मला समजले. तेव्हा मी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना खायला अन्न आणि पाणी मिळत नव्हते. त्याचबरोबर त्यांच्या मुलांचेही हाल होत होते. या सर्व समस्या जाणून घेतल्यावर मी कामाला लागलो आणि माझ्यापरीने त्यांना मदत केली. यामध्ये माझ्या एकट्याचा वाटा नाही. तर कुटुंबियांबरोबर मित्रपरिवार आणि शेजाºयांनीही या कार्यात मला मदत केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या