Thursday, September 28, 2023

क्रिकेटपटूंना नवीन जर्सी मिळाली

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना नवीन जर्सी मिळाली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर महिला आणि पुरुष खेळाडूंनी नवीन जर्सी परिधान करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हरमन प्रीत कौर, स्मृती मानधना, रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल सारखे स्टार खेळाडू या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओसोबत लिहिले आहे की, या जर्सीमुळे तुम्हाला एक गोष्ट जाणवते, काहीही अशक्य नाही! बीसीसीआयने या आठवड्यात टेस्ट आणि क्विक फॉरमॅटसाठी नवीन जर्सी फायनल केली आहे. भारतीय संघ नवीन जर्सी परिधान करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळणार आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या