28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयभाजप नेत्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा

भाजप नेत्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा

एकमत ऑनलाईन

बंगळुरु : दक्षिण कन्नडमधील एका आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याप्रकरणी एका भाजप नेत्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलथांगडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. संतोष(२९), संदीप (३०), लोकैया(५५), गुलाबी(५५), कुसूम (३८), सगुना (३०), अनिल (३५), ललिता (४०), आणि चेन्न केशव (४०) अशी आरोपींची नावे आहेत. बेलथांगडी तालुक्यातील गुरीपल्ला इथे १९ एप्रिलला काही ग्रामस्थांसमोर ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिलेने ८४ सी नुसार तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महसूल अधिकार सरकारी जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी गावात पोहोचले. त्यावेळी संशयीत आरोपींनी गोंधळ केला. तसेच संबंधित अधिका-याला काम सोडून निघून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर तक्रारदाराच्या मोठ्या बहिणीला मारहाण केली. त्यामुळे पीडित महिला बहिणीच्या मदतीसाठी पोहचली असता तिचे कपडे फाडून तिला मारहाण करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या