Thursday, September 28, 2023

‘क्राइम सीरियल’, हादरून टाकणारे प्रकरण : कुटुंबातील 5 जणांना दिले विष

थरारक : टीव्हीवर ‘क्राइम सीरियल’ पाहिल्यानंतर विक्रांतने आपल्या आई आणि बहिणीला विष देऊन केली हत्या….

गाजियाबाद – उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आई आणि मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी कुटुंबातील 5 जणांना विष दिले. हे हादरून टाकणारे प्रकरण बहादपूर येथील आहे.

गेल्या रविवारी आशा, त्यांची मुलगी ऐंजल आणि अनन्या या तिघांची हत्या झाली. या तिघांचा मृत्यू विष प्राशन केल्याने झाला. या तिघींशिवाय आशा यांचे पती आणि मुलगा यांनी देखील विष प्राशन केले. मात्र, त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या दोघांचा जीव वाचला. मृत महिलेचा पती रामेश्वर त्यागीने याप्रकरणी वहिनी गीता, भाचा विक्रांत आणि भाची प्रियांका यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Read More  चीन-भारत सीमावाद : भारताच्या बाजूने उभी राहणार अमेरिका

याप्रकरणी रामेश्वर त्यागी यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या नातेवाईकांनी बराच वेळा ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र, रामेश्वर यांच्या सांगण्यावरून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडे कोणताही ठोस पुरवा नव्हता.

चौकशीदरम्यान गीता आपला मुलगा विक्रांतला अनेकदा ‘क्राइम सीरियल’ दाखवत असे. अशी सीरियल पाहिल्यानंतर गीताने विक्रांतला हत्येची कट आखण्यास सांगितलं. या कामात प्रियांकाने तिच्या आईला मदत केल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

टीव्हीवर ‘क्राइम सीरियल’ पाहिल्यानंतर विक्रांतने आपल्या आई आणि बहिणीला विष देऊन त्याच्या हत्येच्या कटाविषयी सांगितलं. यानंतर रविवारी रात्री गीताने मुलांसह दुधात विष मिसळून आपल्या भाच्याच्या संपूर्ण कुटूंबाला विष दिलं. या मृत्यूच्या खेळात गीताचा मेहुणा रामेश्वर त्यागी बचावले आणि संपूर्ण प्रकरण उजेडात आले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या