29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeराष्ट्रीयराजस्थानात संकट, पायलटांना विरोध

राजस्थानात संकट, पायलटांना विरोध

एकमत ऑनलाईन

गेहलोत गटाचे ९२ आमदार राजीनाम्याच्या तयारीत
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर लगेचच राजस्थानमध्ये काँग्रेससाठी राजकीय संकट उभे राहिले आहे. गेहलोत गट आमदार सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यात येत असेल तर आपण सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा या आमदारांनी दिल्याचे वृत्त आहे. गेहलोत गटातील ९२ आमदारांनी राजीनाम्यावर सही केल्याचे आमदार प्रतापसिंग खाचरियावास यांनी सांगितले.

अशोक गेहलोत यांच्या गटातील सगळे आमदार विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी जात असल्याची माहितीही समोर आली आहे. याआधी काँग्रेस विधायक दलाच्या बैठकीसाठी दिल्लीहून पर्यवेक्षक म्हणून मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, त्याआधी अशोक गेहलोत दोन्ही पर्यवेक्षक थांबलेल्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना भेटले. या तिन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बैठक चालली. यानंतर राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा मुख्यमंत्री निवासस्थानी आले. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही मुख्यमंत्री निवासस्थानी आले.

काँग्रेस विधायक दलाची बैठक संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार होती. पण ८.३० वाजेपर्यंत या बैठकीला सुरुवात झाली नाही. काँग्रेस आमदारांची एक वेगळी बैठक आमदार आणि मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी सुरू आहे. अशोक गेहलोत यांनी पुढच्या महिन्यात होणा-या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. अशोक गहलोत यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता आहे.

अजय माकन, खर्गे यांची उपस्थिती
कॉंग्रेस विधिमंडळ सदस्यांची रविवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला कॉंंग्रेसचे राजस्थान प्रभारी अजय माकन आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत. त्यांनी आमदारांची बैठक घेतली. तसेच नेत्यांशी स्वतंत्र चर्चाही केली. परंतु यादरम्यान मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांना विरोध होत आहे. खासकरून गेहलोत गटाने याला विरोध केला असून, ते मुख्यमंत्री झाल्यास गेहलोत गटाचे ९२ आमदार राजीनामा देऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या