23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय अंत्यसंस्कारात जमावाने केला हल्ला : अर्धवट जळालेला मृतदेह घेऊन पळाले कुटुंबिय

अंत्यसंस्कारात जमावाने केला हल्ला : अर्धवट जळालेला मृतदेह घेऊन पळाले कुटुंबिय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मूमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी जमावावर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर कुटुंबाला चितेवरुन अर्धवट जळालेला मृतदेह घेऊन पळ काढावा लागला. नंतर प्रशासनाने हस्तक्षेप घेतल्यानंतर दुसर्‍या ठिकाणी नियमाप्रमाणे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत व्यक्तीच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, ‘जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोविड -19 मुळे डोडा जिल्ह्यात राहणाऱ्या 72 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला. जम्मू विभागातील कोविड -19 मुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे. मुलगा म्हणाला की, ‘आम्ही महसूल अधिकारी आणि वैद्यकीय पथकासमवेत अंतिम संस्कार करीत होतो. डोमना परिसरातील स्मशानभूमीत चिताला पेटवून देण्यात आले होते, तेव्हा मोठ्या संख्येने स्थानिक लोक तेथे आले आणि अंत्यसंस्कारात अडथळा आणला. ‘

अंत्यसंस्काराच्या वेळी मृताची पत्नी आणि दोन मुलांसह काही निकटचे नातेवाईक होते. जमावाने दगडफेक केली आणि त्यांच्यावर लाठ्यांनी हल्ला केला तेव्हा रुग्णवाहिकेत अर्धवट जळालेला मृतदेह ठेवून हे कुटुंब पळून गेले. पीडित मुलाने सांगितले की, ‘आम्ही आमच्या मूळ जिल्ह्यात शेवटचे अंतिम संस्कार करण्यास सरकारची परवानगी मागितली होती, परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिथे मृत्यू झाला आहे तेथे योग्य ती व्यवस्था केली जाईल आणि स्मशानभूमीत कोणताही अडथळा येणार नाही.’

Read More  भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी जिल्हा हादरला

घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही कोणतीही मदत केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. मुलगा म्हणाला की, घटनास्थळी दोन पोलिस होते पण जमावावर कारवाई करण्यात अपयशी ठरले. त्याचवेळी त्याच्याबरोबरचा महसूल अधिकारी गायब झाला. तो म्हणाला की, ‘रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी आम्हाला खूप मदत केली आणि मृतदेहासह रुग्णालयात नेले. कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी सरकारने चांगल्या योजना तयार केल्या पाहिजेत. अशा लोकांच्या अंत्यसंस्कारातील अलीकडील समस्या आणि अनुभवांची नोंद घ्यावी. ‘ त्यानंतर मृतदेह जम्मूच्या भगवती नगर भागातील स्मशानभूमीत नेण्यात आला आणि अतिरिक्त उपायुक्त, एसडीएम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या