22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिक शहरात १५ दिवस जमावबंदी

नाशिक शहरात १५ दिवस जमावबंदी

एकमत ऑनलाईन

नाशिक : राज्यात घडर्णा­या कायदा व सुव्यवस्था विशेषत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसेच सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिक शहरात १५ दिवस जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नाशिक शहर पोलीसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत काही समाज विघातक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात पंधरा दिवस जमावबंदी आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्रपोलीस अधिनियम १९५१ कलम अन्वये हे आदेश पारित केले असून ते नाशिक शहरात सर्वत्र लागू करण्यात आले आहेत.

नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने काढलेल्या आदेशात म्हटले की नाशिक शहरात विविध आंदोलने, धरणे, सण-उत्सव व राज्यातील कायदा-सुव्यवस्था विषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कुठे जातीय घटना घडल्यास त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेट बंद व साखळी उपोषण चालू असते.

काहीवेळा हिंदू-मुस्लीम यांच्यात शुल्लक कारणावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या