नांदेड: प्रतिनिधी
कोरानाला हरविण्यासाठी देशासह राज्यात चौथा लॉकडाऊन सुरु झाला आहे. जिल्हा प्रशासनाने घालुन दिलेल्या मार्गदर्शक निर्देशा नुसार सोमवारी सकाळपासून शहरातील विविध भागातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलुन गेल्या होत्या.मात्र दुपारी दोननंतर बाजार लॉक झाला.तब्बल ५६ दिवसानंतर बाजारपेठेत गर्दी झाल्याने काही ठिकाणी सोशल डिस्टस्चे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
Read More नवीन १८ रुग्ण पॉझिटिव्ह, नांदेडची रूग्ण संख्या ८४
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च पासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. देशासह राज्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. आता पर्यंत तीन लॉकडाऊन देशाने अनुभवले आहेत. १७ मे पासुन चौथा लॉकडाऊन सुरु झाला असून ३१ मे पर्यंत राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशा नुसार चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही दुकाने सुरू करण्यासाठी अंशता शिथीलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी काढलेल्या आदेशानुसार दुकानांचे वेळापत्रक व कोणते दुकान सुुरु करता येतात याची यादी दिली आहे. त्या नुसार सोमवारी शहरातील विविध भागातील दुकाने सकाळी सुरु झाली.
Read More नांदेडमध्ये मद्यपीना दिलासा
त्यात अॅटोमोबाईल्स ,इलेक्ट्रानिक्स ,संगणक,इलेक्टीकल्स,मोबाईल शॉपी, वॉच सेंटर, स्टेशनरी,बिल्डींग मटेरियल ही दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू झाली होती़ तर शेतिविषयक व किराणा,औषधी दुकाने सांयकाळपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे.चौथ्या लॉकडाऊनमध्ये पहिल्याच दिवशी सकाळी बाजारपेठ सुरु झाल्याने ग्राहकांनी गेल्या दोन महिन्यापासून खोळंबलेल्या कामांसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. शहरातील जुनामोंढा, नविन मोंढा,वजीराबाद, कलामंदिर,आयटीआय परिसर,श्रीनगर,तरोडानाका आदि भागातील त्यात अॅटोमोबाईल्स ,इलेक्ट्रानिक्स ,संगणक,इलेक्टीकल्स,मोबाईल शॉपीची दुकानवर ग्राहकांची गर्दी दिसून आली.
काही ठिकाणी दुकानदार व ग्राहकांनी नियमांचे पालक करित साहित्य खरेदी केले़ तर अनेक ठिकाणी प्रशासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसताच पोलिस प्रशसनाच्या वतीने आव्हान करुन मास्क बांधा, सोशलडिस्टीसिंगचा वापर करा असे आवाहन करण्यात येत होते. दुपारी दोन वाजेपर्यतच दुकाने उघडण्यास परवानगी असल्याने दुपार नंतर बाजारपेठ पुणपणे बंद करण्यात आली़