26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडापाक-अफगाणच्या खेळाडूंत राडा

पाक-अफगाणच्या खेळाडूंत राडा

एकमत ऑनलाईन

पाकच्या फलंदाजाने गोलंदाजावर बॅट उगारली
शारजा : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात खेळाडूंमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना भिडले. पाकिस्तानच्या फलंदाजाने तर यावेळी अफगाणिस्तानच्या खेळाडूवर बॅट उगारली. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सामन्याच्या १९ व्या षटकात हा प्रकार घडला. पाकिस्तानचा फलंदाज अहमद अली फलंदाजी करीत होता. त्यावेळी अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरिद अहमदने बॉल टाकला. त्यावेळी पाकिस्तानच्या आसिफ अलीचा त्रिफळा उडाला. त्यानंतर अहमदने जोरदार सेलिब्रेशन केले. फरिदने जेव्हा सेलिब्रेशन केले, त्यावेळी समोर अली उभा होता. अलीला या गोष्टीचा राग आला आणि त्याने अहमदला ढकलले. त्यानंतर अलीचा पारा चढला आणि त्याने थेट त्याच्यावर बॅट उगारली. यावेळी पंचांनी आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी हस्तक्षेप केला. या गोष्टीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

पण पाकिस्तानने अखेरच्या षटकात थरारक विजय साकारला. पाकिस्तानच्या नसीम शाहने २० व्या षटकाच्या पहिल्या दोन्ही चेंडूवर षटकार खेचले आणि संघाला थरारक विजय मिळवून दिला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आता अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या