Tuesday, September 26, 2023

सीएसची परीक्षा पुन्हा लांबणीवर : परीक्षा 18 ते 28 ऑगस्ट दरम्यान होणार

पुणे: कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची (सीएस) जुलैमध्ये होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता ही परीक्षा 18 ते 28 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज ऑफ इंडियाचे (आयसीएसआय) सहसचिव डॉ. संजय पांडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

दि. 1 ते 10 जून दरम्यान होणारी परीक्षा करोना संसर्गामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ‘आयसीएसआय’ने दि.6 जुलै ते 16 जुलै दरम्यान परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, करोना संसर्ग कमी होत नसल्याने पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

Read More  चिंताजनक बातमी : उस्मानाबादेत २४ तासात कोरोनाचे दोन बळी

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या