25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयग्राहकांना दिलास ; सणासुदीला साबणाच्या किंमती घसरल्या

ग्राहकांना दिलास ; सणासुदीला साबणाच्या किंमती घसरल्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : सणासुदीच्या काळात एकीकडे महागाई वाढत आहे. जगात मंदीचे सावट आहे. शेअर मार्केटवर देखील मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये दिवाळीच्या आधी साबण कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. साबण कंपन्यांकडून साबणाच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.

एफएमसीजी कंपन्यांनी साबणाचे दर कमी केल्यामुळे आता सणासुदीला ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलपासून जीवनावश्यक वस्तू ते गॅस सिलिंडर सगळंच दिवसेंदिवस महाग होत आहे. साबणाच्याकिंमती कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

रोजच्या वापरातील वस्तू तयार करणा-या एफएमसीजीकंपनीने साबणाच्या किंमती १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या उत्पादनाच्या किंमती घसरल्याने हा निर्णय घेतल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड, गोदरेज यांनी साबणा-याकिंमती कमी केल्याची माहिती मिळाली आहे.
किती रुपयांनी स्वस्त होणार साबण

लाइफबॉय आणि लक्स ब्रँडने साबणाच्यह्याकिंमतीमध्ये ५ ते ११ टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत. गोदरेजने १३ ते १५ टक्के किंमती कमी केल्या आहेत. गोदरेज नंबर वन साबणाच्या पाच पाकिटांचीकिंमत १४० रुपये होती.
हा साबण आता १२० रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे सणासुदीला घरात तुम्ही साबण खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशावरचा भार कमी होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या