28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रदहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार

दहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंद पथकांना दिलेल्या सोयी सुविधांमध्ये आणखी एक मोठी घोषणा केली आहे. गोंिवदांना दहिहंडी फोडताना दुखापत झाल्यास अशा गोंिवदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत काल, गुरुवारीच विधानसभेत घोषणा केली होती. राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील, असे कळविण्यात आले आहे.

तसेच, गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा राबवण्यात आली आहे. इतर खेळांप्रमाणं या गोविंदांदेखील शासकीय नोक-यांमध्ये ५ टक्के कोट्याचा लाभ घेता येईल. तसेच इतर सुविधांचाही लाभ घेता येईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या