विद्युत पोल, झाडे कोसळली . अनेक वाहनांचे नुकसान . प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली
निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा शहरासह परिसरात शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान वादळी वारा व विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शहरात व परिसरात झाडे व लाईटचे पोल पडून अनेक घरांचे, दुकानांचे व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
शहरातील निळकंठेश्वर मार्केट परिसरात नगर परिषद संकुलावरील शेजारीच असलेल्या लाईटच्या खांबावर हे पत्र्याचे
शेड पडल्याने विद्युत तारा तुटून या घरावर व दुकानावर अस्ताव्यस्त पडल्या .मात्र याच वेळी विद्युत प्रवाह बंद असल्याने मनुष्यहानी टळली. हजरत पीर पाशा दर्गा परिसरात चिंचेचे मोठे वटवृक्ष कोसळून चार घराचे मोठे नुकसान झाले. यामध्ये कार व दुचाकी याचाही चुराडा झाला. याच परिसरातील लाईटचे पोल व तारा तुटून या चौघांच्या घरावर पडल्या़ .उपजिल्हा रुग्णालय परिसरात ही मोठी झाडे कोसळली आहेत. तसेच शहरासह परिसरातील अन्य ठिकाणीही झाडे व पोल पडले असून प्रशासनाकडुन याची माहिती घेण्याचे काम
Read More लोहारा येथे कोरोनाच्या संकटात बँकेत गर्दी, प्रशासनाने दखल घेण्याची गरज
सुरू आहे. घटनेचे वृत्त कळताच नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी नगरपरिषद कर्मचाराासह सर्व ठिकाणी भेट दिली. आणि ही झालेली पडझड काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु केले.
किल्लारी परिसरात वीज पडून गाय ठार
किल्लारी परीसरात दुपारी २ वाजल्यापासून सुमारास झालेल्या वादळीवा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला़ या पावसामुळे किल्लारी भाग २ येथे शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ यामध्ये अंगणवाडी क्र.१७ चे पत्रे उडून दूरवर जाऊन आतील लहान मुलांचे शैक्षणिक साहित्याचे हजारोचे नुकसान झाले़ तसेच गावातील घरावरील व किराणा दुकानावरील पत्रे उडून गेले़ घरावर झाडे उमडून पडले तसेच कल्पना संजय चितकोटे यांच्या शेतातील गाय वीज पडल्यामुळे मरण पावली आहे, राम जिडगे याच्या किराणा दुकानवरील पत्रे, संतोष भोसले, अभिमन्यू सोनटक्के यांच्या घरावरील पत्रे उडाले तर अल्ली टप्पेवाले यांच्या घरासमोरील झाड कोसळून म्हैस गंभीर जखमी झाली़ या घटनेत हजारोंचे नुकसान झाले़ नुकसानीचे पंचनामा करुन शासनाने संबधितांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरीकांच्यावतीने होत आहे. या घटनेची माहिती मिळताच किल्लारी सज्जाचे तलाठी विजयकुमार उस्तुरे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केल्याची माहिती त्यानी दिली.
कार्यकारी अभियंत्यांची सजगता
दुपारी या मोठ्या पावसाला सुरुवात होताच अवकाळी पावसाचा अंदाज घेत येथील कार्यकारी अभियंता ढाकणे यांनी तात्काळ शहरातील व परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णता बंद केल्यामुळे लाईटच्या तारा घरावर कोसळल्या मात्र महावितरणच्या सतर्कतेमुळे मनुष्यहानी टळली़