22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रआम्हाला धोका दिला, मुंबईला धोका देऊ नका 

आम्हाला धोका दिला, मुंबईला धोका देऊ नका 

एकमत ऑनलाईन

मुंबई : आम्हाला धोका दिला पण मुंबईला धोका देऊ नका, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला केले आहे. आरेचे जंगल मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आरेच्या जंगलाचा प्रश्न नसून त्याठिकाणी असलेल्या जैवविविधतेचाही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुंबईतील आरेमध्ये पुन्हा एकदा मेट्रोचे कारशेड स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. नव्या सरकारने घेतलेल्या या पहिल्याच निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग, गोरेगाव पहाडी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेच्या पर्यायावर विचार सुरू होता. या नव्या सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईवर घाला घालणारा असल्याचे त्यांनी म्हटले. आमचा राग मुंबईवर काढू नका असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आरेचा मुद्दा हा फक्त जंगलाचा नाही तर जैवविविधतेचा आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले.

आरेमध्ये आज आंदोलन
आज आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी सर्व पर्यावरणवादी आणि संघटनांना जमण्याचे आवाहन केले आहे. आदित्य ठाकरे यांच्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनीदेखील आरेतील मेट्रो कारशेडला विरोध दर्शवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या