37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयनवीन पिढीची खतरनाक रायफल : भारतीय सैनिकांना मिळणार AK-47 203

नवीन पिढीची खतरनाक रायफल : भारतीय सैनिकांना मिळणार AK-47 203

एकमत ऑनलाईन

मॉस्को : चीनला एकदा दोनदा नाही अनेकदा नडणाऱ्या भारतीय सैनिकांना मोठे घातक शस्त्र मिळणार आहे. भारत आणि रशियाने अद्ययावत AK-47 203 रायफलींची डील फायनल केली आहे. जुन्या मॉडेलपेक्षा ही रायफल हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये, लडाखसारख्या किंवा कारगिलसारख्या उंच ठिकाणी लढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. यामुळे उंचीवर लपलेल्या शत्रूच्या सैनिकांना खालूनच अचूक टिपता येणार आहे.

भारताकडील इन्सास रायफलींची जागा घेणार

चीनसोबतचा तणाव आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीमाविवाद पाहता ही डील खूप महत्वाची मानली जात आहे. रशियन वृत्तसंस्थांनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर असून हा निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनात घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पहिली AK-47 ही रायफल रशियानेच तयार केली होती. आता जगभरात या रायफली बनविल्या जातात. परंतू रशियाकडे सध्या नवीन पिढीची खतरनाक रायफल आहे. ही रायफल भारताकडील इन्सास रायफलींची जागा घेणार आहे. हिमालयाच्या उंच जागांवर ही रायफल जाम होणे किंवा मॅगझिन तुटण्यासारख्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नवीन राफलची भारतीय सैन्याला नितांत गरज आहे.

भारतीय सैन्याला 7.7 लाख रायफली हव्यात

रशियाचे चॅनल स्पूतनिक न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्याला 7.7 लाख रायफली हव्या आहेत. यापैकी एक लाख रायफली रशियात बनविल्या जाणार असून उर्वरित भारतात बनविल्या जाणार आहेत. या रायफलींचे निर्माण इंडो-रशिया प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL) मध्ये केले जाणार आहे. हा सहकार्य करार कलाश्निकोव्ह आणि रोसोबोरोनएक्सपॉर्ट सोबत करण्यात आला आहे.

एका मिनिटात 600 गोळ्या , 1 सेकंदात 10 गोळ्या झाडू शकते

रशियाची ही AK-203 रायफल जगातील सर्वात घातक रायफल आहे. याची किंमत 1100 डॉलर असून यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण आणि अन्य सहयोग किंमती आहेत. ही खूप छोटी आणि हलकी रायफल आहे. यामध्ये 7.62 एमएम जाडीच्या गोळ्यांचा वापर होतो. महत्वाचे म्हणजे ही रायफल एका मिनिटात 600 गोळ्या किंवा 1 सेकंदात 10 गोळ्या झाडू शकते. ही रायफल अॅटोमॅटीक आणि सेमी अॅटोमॅटीक अशा दोन्ही मोडवर चालविली जाते. ही रायफल पूर्णपणे लोड केल्यानंतर तिचे वजन 4 किलो होते.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या