26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदानिश सिद्दीकी यांना दुस-यांदा पुलित्झर

दानिश सिद्दीकी यांना दुस-यांदा पुलित्झर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पत्रकारिता, साहित्य, संगीत आणि कला या क्षेत्रासाठीचा २०२२चा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू, अमित दवे आणि दानिश सिद्दीकी यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोना काळात भारतातील विविध ठिकाणांचे फोटो काढले होते.विजेत्यांमधील दानिश सिद्दीकी यांना दुस-यांदा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

दानिश सिद्दीकी यांनी कोरोना काळात असे फोटो काढले, जे पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू आले. एक फोटो दिल्लीतील स्मशान भूमीचा होता. या स्मशानाच्या शेजारी कॉलनी होती तर दुस-या बाजूला अनेक मृतदेह दिसत होते. दानिश यांना दुस-यांदा पुलित्झर मिळाला आहे. पण हा पुरस्कार घेण्यासाठी ते या जगात नाहीत.
दानिश यांनी दिल्ली हिंसाचार, शेतकरी आंदोलन, कोरोनासह अनेक महत्त्वाच्या घटना कॅमे-यात कैद केल्या होत्या. तालिबानने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या