23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रदानवे हे बारामतीचे पोपट

दानवे हे बारामतीचे पोपट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज ठाकरेंच्या वक्तव्यांवर कडाडून टीका करणा-या शिवसेना नेते अंबादास दानवेंवर मनसे नेते गजानन काळे यांनी जहरी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विधान परिषदेवर निवडून आले, तेदेखील औरंगजेबाची औलाद ओवेसीच्या नगरसेवकांच्या जिवावर. लॉटरीत त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले, अशीही टीका गजानन काळे यांनी केली आहे.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंनी भाजपची स्क्रिप्ट वाचल्याचा आरोप केला. मात्र दानवे हेच बारामतीचे पोपट आहेत, असा टोला गजानन काळे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसची तळी उचलल्यामुळेच तुमचा पक्ष संपला आहे, असे बोलही काळे यांनी सुनावले.

गजानन काळे यांची टीका काय?
अंबादास दानवेंवर टीका करताना गजानन काळे म्हणाले, ‘मुळातच हिंदुत्वाच्या असली-नकलीच्या गप्पा मारायच्या. अंबादास दानवे विधान परिषदेवरून औरंगाबादमधून निवडून गेले. ते औरंगजेबाची औलाद ओवेसीच्या एमआयएमच्या नगरसेवकाच्या जिवावर निवडून येतात. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तळी उचलून स्वत:चा पक्ष संपूर्णपणे संपवला आहे. याची आठवण मला अंबादास दानवेंना करून द्यावी वाटते. लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने काहीही बरळू नका, अशी विनंती मी करतो. बारामतीचा पोपट अशा पद्धतीने विरोधी पक्षनेता म्हणून बोलायला लागला तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, एवढे नक्की.

अंबादास दानवेंचे वक्तव्य काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पदाधिका-यांच्या मेळाव्यात शिंदे गट आणि भाजपवर चौफेर टीका केली. शिवसेनेकडे विचार नाही, म्हणून पक्षाची ही अवस्था झाल्याची टीका राज ठाकरेंनी केली. याला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, राज ठाकरे हे भाजपाची तळी उचलण्याचे काम करत आहेत. भाजप ज्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहून देतात, त्याचप्रमाणे राज ठाकरे भाषणात बोलत असतात. ईडीच्या नोटिशीनंतर त्यांच्या भूमिकेत कमालीचा बदल झाला आहे, अशी थेट टीकाही दानवे यांनी काल केली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या