22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeऔरंगाबादखुलताबादेत पैगंबरांच्या पवित्र पोशाखाचे होणार दर्शन

खुलताबादेत पैगंबरांच्या पवित्र पोशाखाचे होणार दर्शन

एकमत ऑनलाईन

– हिंदू-मुस्लिम ऐक्याचा  उरूस
औरंगाबाद : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये सर्वांत मोठा उरूस भरवला जातो. या ठिकाणी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील सर्वधर्मीय भाविक या उरुसामध्ये सहभागी होत असतात. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणामध्ये या उरुसाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून या ठिकाणी सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यासोबतच खुलताबाद तालुक्यामध्ये हजरत ख्वाजा मुन्तजबद्दीन जर जरी जर बक्ष यांचा दर्गा आहे. या दर्गाहमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उरूस भरवला जातो. यावर्षी या उरुसाचे ७३६वे वर्ष आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी भरणा-या उरुसाची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी पोलिसांनी तगडा बंदोबस्त या ठिकाणी केला असून यासाठी ४६ सीसीटीव्ही लावलेले आहेत.

ज्यामुळे प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर असणार आहे. त्यासोबतच आरोग्य यंत्रणा देखील सज्ज करण्यात आलेली आहे. ८ ऑक्टोबरला मिलाद, ९ ऑक्टोबरला ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजेच मोहंमद पैगंबर यांचा पोशाख व केस दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.

इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा १४०० वर्षांपूर्वीचा पवित्र पोशाख ७०० वर्षांपासून खुलताबाद येथे हजरत ख्वाजा सय्यद जैनोद्दीन शिराजी दर्गामध्ये जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यामुळे खुलताबाद येथील दर्गाहमध्ये मोठ्या भक्तिभावाने सर्वधर्मीय भाविक सहभागी होत असतात.

यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून विविध कानाकोप-यातून भाविक या ठिकाणी येत असतात. हजरत मोहम्मद पैगंबर यांना अल्लाहने शब-ए-मेहराजच्या रात्री भेट दिलेला पवित्र पोशाख चांदीच्या पेटीतून बाहेर काढून मखमली आच्छादनावर दर्शनासाठी ठेवला जातो असे सांगितले जाते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या