26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeराष्ट्रीयदास यांच्याकडे ३३ कोटींची संपत्ती, ८० गाड्यांचा ताफा

दास यांच्याकडे ३३ कोटींची संपत्ती, ८० गाड्यांचा ताफा

एकमत ऑनलाईन

भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबा किशोर दास हे नवीन पटनाईक यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक मंत्री होते. २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या प्रमाणे त्यांच्याकडे ८० गाड्या होत्या. ज्याची किमंत २५ कोटी रुपये आहे. नबा किशोर दास यांनी नुकतेच त्रिवेणी अमावस्येला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर मंदिराला १.७ किलो सोन्याचा आणि ५ किलो चांदीचा कलश भेट दिला होता. सध्याची दास यांची संपत्ती ३३ कोटी रुपयांची होती.

नबा दास हे काँग्रेस सोडून बीजेडीमध्ये आले होते. नवीन पटनाईक यांनी त्यांना मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. नवीन पटनाईक यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री अशी त्यांची ओळख बनली होती. नबा किशोर दास यांच्याकडे असलेल्या ८० वाहनांमध्ये मर्सिडीजचा देखील समावेश आहे. याचीकिंमत १.९६ कोटी इतकी आहे. नबा दास यांनी गेल्या वर्षी ६० वाहनांची खरेदी केली होती. भुवनेश्वर आणि संबळपूरसह विविध शहरातील बँक खात्यात त्यांचे २८.५९ लाख रुपये आहेत. तर, ६७.२५ लाख रुपयांची मुदत ठेव नबा दास यांच्या नावावर आहे. २ करोड़ की रिवॉल्वर-रायफल

निवडणूक कागदपत्रांच्या माहितीनुसार नबा दास यांच्याकडे १ लाख ९८ हजार ५४० रुपयांचे दाग दागिने आहेत. तर रायफल, बंदूक देखील त्यांच्याकडे आहे. त्याचीकिंमत १ लाख ९७ हजार ५०० रुपये आहे. नबा दास यांच्यानावावर १.८१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती.

झारसुगुडा जिल् तील प्रभावी नेता अशी नबा दास यांची ओळख होती. ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते त्यावेळी राज्यातील काँग्रेसचा प्रमुख नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडत बिजू जनता दलात प्रवेश केला होता. नवीन पटनाईक यांच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते.

पत्नी आणि मुलाकडेही संपत्ती

नबा किशोर दास यांच्या पत्नीच्या नावावर १.७४ कोटी रुपयांची रोख रक्कम, एफडी आणि एलआयचीच्या स्वरुपात संपत्ती आहे. तर, मुलाच्या खात्यात ६०.५९ लाखांची रक्कम असून ५.६४ लाखांची मुदत ठेव आहे. नबा किशोर दास यांनी ७ दिवसांपूर्वी शनि शिंगणापूरच्या शनि देवाला एक कोटी रुपयाचा कलश अर्पण केला होता. एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीचा उपयोग करून हा कलश तयार करण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या