24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयदाऊद गँगचा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना फोन

दाऊद गँगचा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना फोन

एकमत ऑनलाईन

भोपाळ : भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दाऊद गँगकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, धमकी देणा-यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. ‘मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय’ असे सांगत तुझा खून होणार आहे, अशी धमकी प्रज्ञा ठाकूर यांना फोनवरून देण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भोपाळमधील टीटी नगर पोलिस ठाण्यात ठाकूर यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच फोन करणा-याने स्वत:ची ओळख दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस अशी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेवेळी साध्वी यांच्यासोबत उभ्या असलेल्या लोकांनी या संभाषणाचा व्हीडीओही रेकॉर्ड केला असून, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रज्ञा ठाकूर यांना आलेल्या धमकीचा फोन नेमका कुठून आला याबद्दल अद्याप ठोस माहिती समोर आलेली नसून, तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

साध्वींकडून नुपूर शर्मांचे समर्थन
काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर देशासह परदेशातून या विधानाचा विरोध करण्यात आला. दरम्यान, शर्मा यांच्या या विधानाचे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी समर्थन करत भारत हिंदूंचा असल्याचे म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या