24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Home22 हजारात ठरला सौदा : दारूसाठी बापानेच 2 महिन्यांच्या बाळाला विकलं

22 हजारात ठरला सौदा : दारूसाठी बापानेच 2 महिन्यांच्या बाळाला विकलं

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, 28 मे : पैसे आणि दारूच्या लालसेने हैदराबाद (हैदराबाद) येथील प्रवासी मजूर मदन कुमार सिंह यांनं शेजाऱ्याला आपलं 2 महिन्यांचे बाळ विकलं. मदननं आपल्या मुलाला शेजारी राहणाऱ्या देवी नामक महिलेला 22 हजार रुपयांना विकलं. पोलिसांना माहिती मिळताच दोघांनाही अटक करण्यात आली. ही घटना 23 मे रोजी घडली. सध्या मूल शिशु विहारमध्ये आहे, अद्याप बाळाला आईकडे सोपवण्यात आलेले नाही आहे.

50 हजारांची मागणी केली
मदनच्या शेजारी राहणाऱ्या सेशुच्या बहिणीला मूल नव्हतं, जेव्हा त्यांना कळलं की मदनला मुलगा झाला आहे, तेव्हा त्यांनी मदनला विचारलं. मदनही बाळ दत्तक देण्यासाठी तयार झाला. जेव्हा मदन बाळ सोपवण्यासाठी पोहचला तेव्हा त्यानं 50 हजारांची मागणी केली. अखेर त्यांनी बाळाचा 20 हजार रुपयांचा सौदा केला.

22 हजारांचं कर्ज घेत बाळ विकत घेतलं
मदनच्या शेजारी राहणाऱ्या देवीकडे बाळाला विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळं त्यांनी 22 हजारांचं कर्ज घेत बाळ विकत घेतलं. देवीचा नवरा देवीचा नवरा ऑटो चालवितो, दोघांनाही मूल नसल्याचे त्यांनी मदनच्या मुलाला विकत घेतलं. मात्र पोलिसांना प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी मदनचा शोध घेण्यास सुरुवात केली. सध्या पोलिसांनी तिघांना नोटीस देऊन सोडलं आहे.

Read More  दहशतवादी कसाबची ओळख पटवणा-या साक्षीदाराचे निधन

आजूबाजूच्या लोकांना कळलं आणि त्यांनी पोलिसांत तक्रार
मदनची पत्नी सरितानं पोलिसांना सांगितलं की, तिच्या नवऱ्यानं तिला न सांगताच बाळाचा सौदा केला. जेव्हा तिला कळलं तेव्हा तिनं आरडाओरडा करण्यास सुरवात केली, ज्यानं आजूबाजूच्या लोकांना कळलं आणि त्यांनी पोलिसांत तक्रार केली. दरम्यान सरितानं तिचा नवरा दारू पिण्यात सगळे पैसे घालवतो, त्यामुळं दोन वेळच्या जेवणासाठी घरात पैसे नसल्याचंही पोलिसांना सांगितलं.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या