Saturday, September 23, 2023

भारतातील करोनाबळी २० हजारांच्यापुढे

देशातील करोनाबाधित रुग्ण दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहेत. भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण बळींची संख्याही २० हजारांच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असलेल्या देशात भारत आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. देशात दररोज वाढत असलेल्या करोनाबाधित रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण आहे.

आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत २२ हजार २५२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाख १९ हजार ६६५ इतकी झाली आहे. दोन लाख ५९ हजार ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत तब्बल ४६७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण करोनाबाधित रुग्णांच्या बळींची संख्या २० हजार १६० इतकी झाली आहे. समाधानकारक बाब म्हणजे, आतापर्यंत चार लाख ३९ हजार ९४८ जणांनी करोनावर मात केली आहे.

Read More  भारतानंतर अमेरिकाही टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या