उपचार न भेटल्यामुळे अखेर तिने जीव सोडला : कंटेनमेंट झोनमध्ये होते म्हणून नाही केलं भरती
नोएडा : कोरोनाची भीती लोकांच्या मनात अशी काही बसली आहे की त्यामुळे माणूसकीसुद्धा हरवली आहे. याचंच एक काळजाचं पाणी करणारं उदाहरण समोर आलं आहे. उपचारासाठी रुग्णालयांच्या दारात फिरणाऱ्या 8 महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. गर्भवती महिलेला कोरोनाची लक्षण असल्यामुळे तिला कोणीही रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. तब्बल 13 तास गर्भवती महिला रुग्णवाहिकेतून एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रवास करत राहिली. पण योग्य वेळी उपचार न भेटल्यामुळे अखेर तिने जीव सोडला.
सगळ्यात वाईट म्हणजे तिच्या बाळाचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. दिल्लीला लागून असलेल्या नॉऐडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच डीएम सुहास एल वाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. माणूसकीची काळी बाजू या घटनेनंतर समोर येते. या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या प्रकारावर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे.
Read More दहावीचा निकाल २० ते ३० जुलैपर्यंत तर बारावीचा ५ ते १४ जुलै दरम्यान
गाजियाबादच्या खोडा कॉलनीमध्ये निवासी असलेल्या नीलम कुमारी ही 8 महिन्याची गर्भवती होती. प्रसुती कळा सुरू झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 च्या दरम्यान तिला रिक्षाने एका रुग्णालयात नेण्यात आलं. नीलमचे पती बृजेंद्र एका मीडिया फर्ममध्ये मेंटेनंसचं काम करतो. त्याचा भाऊ शैलेंद्र कुमार रिक्षा चालक आहे. शैलेंद्र आणि त्याची पत्नी सुषमा रिक्षाने नीलमला घेऊन नोएडाच्या सेक्टर 24 असलेल्या ईएसआईसी रुग्णालयात घेऊन गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलम वायर मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काम करत होती. तिच्याकडे ईएसआय कार्डही होतं. शैलेंद्र म्हणाला की, ईएसआयसी रुग्णालयाने काही काळ तिला ऑक्सिजन लावलं आणि नंतर सेक्टर 30 इथल्या जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी सांगितलं. पण तिथल्या कर्मचार्यांनी तिला भरती केलं नाही. खोडा इथून आलो असं सांगितलं असता कंटेनमेंट झोन मधून आला आहात असं सांगून उपचारासाठी नकार दिला.
त्यानंतर नीलमसा सेक्टर 51मध्ये शिवालिक रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथेही महिलेची स्थिती गंभीर आहे तिला चांगल्या रुग्णालयात दाखल करा असं सांगण्यात आलं. त्यानंतर तिला फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आलं तिथेही कारण देत नीलमवर उपाचर करण्यात आले नाही. अशा प्रकारे प्रसुती कळा आणि कोरोनाचा त्रास सहन करत नीलमला तब्बल 8 रुग्णालयांत उपचारासाठी नेण्यात आलं. पण तिच्यावर कोणीही उपचार केले नाही. गंभीर बाब अशी की तिला कोव्हिड रुग्णालयातदेखील दाखल करण्यास नकार दिला. नीलम आणि तिच्याकडू कोरोनाची चाचणी करण्यासाठी पैसे घेतले पण तिची टेस्टही केली नसल्याचा आरोप शैलेंद्र कुमार याने केला आहे. या सगळ्यामध्ये अखेर नीलमचा जीव गेल्या, तिच्यासोबत तिच्या बाळाचाही मृत्यू झाला.