22.1 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home महाराष्ट्र महाड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८ वर : ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा...

महाड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८ वर : ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

एकमत ऑनलाईन

महाड (प्रतिनिधी) : महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८ वर पोहोचला आहे. फारुख काझी आणि युनूस शेख या दोन्ही बिल्डरसह सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेची राज्य सरकारने दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही इमारत कोसळली. इमारत कोसळताना मोठा आवाज झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिक आराडा-ओरडा आणि आक्रोश करीत होते, तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली. इमारतीत ४७ कुटुंबे राहात होती. दुर्घटनेतील जखमींची नावे : नमिरा शौकत अलसूरकर (वय १९ वर्षे), संतोष सहानी (२४), फरीदा रियाज पोरे, जयप्रकाश कुमार (२४), दिपक कुमार (२१), स्वप्निल प्रमोद शिर्के (२३), नवीद हमीद दुष्टे (३२) आणि मोहम्मद बांगी (४)

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले
मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी एडीआरएफचे पथक महाड येथील दुर्घटना स्थळी पोहोचून तातडीने शोधकार्याला सुरुवात केली. महाड इमारत दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अमित शाह यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, एनडीआरएफच्या डीजींशी संवाद साधला आहे. दुर्घटनेतील लोकांना वाचवण्यासाठी शक्य तितकी मदत करण्यात येत आहे.

 चिमुकल्याला ढिगा-याखालून सुखरुप बाहेर काढले
‘देव तारी त्याला कोण मारी’, याचा प्रत्यय रायगडमधील इमारत दुर्घटनेच्या बचावकार्यादरम्यान आला. इमारतीच्या ढिगा-याखालून मंगळवारी दुपरी लहान मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. तब्बल १९ तासांनंतर साडेतीन वर्षांच्या मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगा-याखालून सुखरुप बाहेर काढले. यावेळी सगळ्यांचाच चेहरा आनंदाने उजळून निघाला. टाळ्यांच्या कडकडाट झाला. शिवाय गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या. एनडीआरएफच्या जवानांना दोन पिलरमध्ये एक पाय हलताना दिसला. एका जवानांना पायाला अलगद स्पर्श करत त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोहम्मदनेही त्यांना प्रतिसाद दिला आणि काही क्षणातच एनडीआरएफच्या जवानांनी तो पिलर कटरच्या साह्याने तोडून चिमुकल्या मोहम्मदला या ढिगा-यातून सुखरुप बाहेर काढले. तब्बल १८ ते १९ तास अंधारात, उपाशी आणि भीतीच्या छायेत राहिलेल्या मोहम्मदने बाहेर आल्यानंतर एक शब्द उच्चारला तो म्हणजे ‘अम्मी आणि अब्बू’. मोहम्मदला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तब्बल १८ तास मोहम्मदने आपल्यावर ओढावलेल्या परिस्थितीशी झुंज दिली. शेवटी तो या संकटातून बाहेर पडला.

सरकारवर विश्वास कसा ठेवणार’-आ. नितेश राणे 
राज्य सरकारने इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसाला ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘सरकारवर विश्वास कसा ठेवणार’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण, निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या रायगडवासीयांना अद्यापही पूर्ण नुकसानभरपाई मिळाली नाही. आता, महाड इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकारने केली आहे. पण, या विश्वासघातकी सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जनतेने?, असे नितेश राणेंनी म्हटले आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रश्न उपस्थित केला आहे.

वापरण्यात आलेले साहित्य हलक्या प्रतीचे
या इमारतीचे बिल्डर फारुख काझी, युनूस शेख, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इमारत बांधणा-या बिल्डरने केवळ एका वर्षात ही इमारत उभी केली आहे. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य हलक्या प्रतीचे असून इमारतीचे कामही तकलादू केल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते. त्यानंतर या बिल्डरवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच त्याच्याकडून प्रत्येक कुटुंबासाठी नुकसानभरपाई वसूल करावी अशी मागणी या इमारतीत राहणारे लोक करत होते. यातील बिल्डर फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या लसीवर ट्रम्प यांचे भवितव्य अवलंबून?

ताज्या बातम्या

फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७...

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे, मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता...

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

मुंबई : राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि़ २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून, सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

आणखीन बातम्या

फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७...

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

मुंबई : राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि़ २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून, सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

विकास दरात आणखी घसरण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी दुस-या...

इजिप्तमध्ये कोरोना टेस्ट करणारा रोबो

काहिरा : इजिप्तमध्ये कोरोनासाठी करावयाच्या चाचण्यांसाठी चक्क रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. हुबेहुब माणसासारखा दिसणाºया या रोबोला सीरा -०३ असे नाव संशोधकाने दिले आहे....

शेतक-यांची दिल्लीत कुच

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतक-यांना अखेर दिल्लीत प्रवेश मिळाला आहे़ शुक्रवार दि़ २७ नोव्हेंबर रोजी पोलिस आणि आंदोलकांत...

देशात ८० टक्के लोक मास्क विना

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना, नियमावली जारी केली आहे. मात्र, जनतेमध्येच नियम पाळण्याबाबत अनास्था...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...