22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयउत्तराखंडात मृतांची संख्या ४६ वर

उत्तराखंडात मृतांची संख्या ४६ वर

एकमत ऑनलाईन

हरिव्दार : उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि त्यातून निर्माण झालेली पूरस्थिती असा घटना घडल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे राज्यभर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ४६ लोकांना आपले प्राण गमवाले लागले आहेत. त्यासोबतच, अनेकजण बेपत्ता असल्याची देखील माहिती मिळत आहे. उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी देखील आज पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूरस्थितीची माहिती दिली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ११ जण बेपत्ता आहेत. काही जण जखमी देखील जाले आहेत. एकूण मृतांचा आकडा ४६ पर्यंत गेला आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, पाऊस आता कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुन्हा सर्व सुरळीत व्हायला वेळ लागेल. रस्ते वाहून गेले आहेत, दरडी कोसळल्या आहेत, काही ठिकाणी नद्यांनी आपले मार्ग बदलले आहेत. गावांना फटका बसला आहे, पूल कोसळले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, स्थानिक पातळीवर बचाव आणि दुरुस्ती कार्य तातडीने केले जावे, यासाठी सर्व जिल्हाधिका-यांना तातडीने १० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आल्याचेदेखील त्यांनी सांगितले. रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आम्ही सुरक्षित स्थळी आणत आहोत. चारधाम यात्रेच्या ठिकाणी देखील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या