24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeडेक्कन क्वीन नव्या रूपात दाखल

डेक्कन क्वीन नव्या रूपात दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी वेगवान अशी डेक्कन क्वीन बुधवारपासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. वजनाने हलके आणि अपघातरहित एलएचबी डबे आणि वेगळी रंगसंगती डेक्कन क्वीनला देण्यात आली आहे.

सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी नवी गाडी सीएसएमटी येथून पुण्यासाठी निघाली. मुंबई ते पुणे दरम्यान मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग या रेल्वेने प्रवास करतो. त्यांची डेक्कन क्वीनलाच अधिक पसंती असते.

ही गाडी १ जुन १९३० रोजी पहिल्यांदा धावली. त्यापूर्वी ही गाडी कल्याण ते पुणे धावत होती. त्यानंतर सीएसएमटीपर्यंत धावायला लागली. यात महिलांसाठी राखीव डबे, पासधारकांसाठी डबे, जनरल डबे, वातानुकूलित डब्यांबरोबरच डायनिंग कारही आहे. अशा डेक्कन क्वीनला नव्या रुपात आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या